गोंदिया: 11 पोलीस अमलदारांचे पोलीस अधिकारी बनण्याचे झाले स्वप्न पुर्ण..




 गोंदिया। एसपी गोंदिया निखिल पिंगळे, यांनी महाराष्ट्र शासन, गृहविभाग शासन निर्णयामधील दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे अनुषंगाने शासन निर्णयात दिलेले निकष व विहीत अटीच्या अधीन राहुन गोंदिया जिल्हा पोलीस आस्थापनेवरील नेमणुकीस असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संबोधण्याची कार्यवाही करणेकामी शासन निर्णयातील विहित अटी व निकष पूर्ण करीत असलेल्या- पोलीस दलामध्ये 30 वर्ष सेवा पूर्ण झालेले, सहा. पोलीस उप- निरीक्षक पदावर किमान 3 वर्ष सेवा पूर्ण केलेले आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्ग पदाचे वेतन घेत असलेले गोंदिया जिल्हा पोलीस आस्थापनेवरील विविध पोलिस ठाणे, स.दु क्षेत्र, शाखा, येथे नेमणुकीस असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ( Grade - PSI ) संबोधण्या बाबत घेण्यात आलेल्या पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीतील शिफारशी नुसार एकूण 11 सहा. पोलीस उपनिरीक्षकांना यापुढे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (Grade- PSI ) संबोधण्यात येत असल्याबाबतचे  दिनांक 03/05/2022 रोजी च्या आदेशान्वये सहा. फौ. ते ग्रेड Psi ( पोलीस अंमलदार ते पोलीस अधिकारी ) असे बढती चे आदेश काढून पोलीस अधिकारी बनण्याचे पोलीस अंमलदारांचे  स्वप्न पूर्ण केले आहे. 
   
 पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर, यांनी  पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ती झालेल्या व यापुढे श्रेणी पो. उप. नि. म्हणून संबोधण्यात येणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे त्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छासह अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post